एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळून शहरातील करोडोंच्या जमिनींची विल्हेवाट लावण्याचा परबांचा डाव आहे - पडळकर

75 просмотров 11.12.2021 00:01:52

Описание

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा गेले कित्येक दिवस संप सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी सोमवार १३ डिसेंबर २०२१ पर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. परंतु कर्मचारी कामावर रुजू न झाल्यास त्यांच्यावर मेस्मा आणि कठोर कारवाई केली जाणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्य सरकारच्या या भूमिकेवरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. मुघलशाही पद्धतीने मेस्मा कायदा लावण्याच्या धमकीचा निषेध करतो. , असं देखील ते म्हणाले आहेत. तसंच एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळून शहरातील करोडोंच्या जमिनींची विल्हेवाट लावण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी अनिल परब यांच्यावर केला आहे. #GopichandPadalkar #anilparab #STEmployee #maharashtra

Комментарии

Теги:
एसटी, कर्मचाऱ्यांचा, चिघळून, शहरातील, करोडोंच्या, जमिनींची, विल्हेवाट, लावण्याचा, परबांचा, पडळकर