Lokmat Sport Update | आता हा खेळाडूं ठरला आहे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती | Lokmat News

0 просмотров 13.09.2021 00:01:12

Описание

टेनिसपटू रॉजर फेडररच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. गोल्फपटू टायगर वुड्सला मागे टाकत रॉजर फेडरर वैयक्तिक क्री़डा प्रकारात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला. फोर्ब्स मासिकाने दिलेल्या अहवालानुसार, रॉजर फेडररने आतापर्यंत बक्षिसांच्या माध्यमातून ११ कोटी २ लाख ३५ हजार ६८२ अमेरिकी डॉलर्सची कमाई केली. फेडररने टायगर वुड्सच्या ११ कोटी ६१ हजार अमेरिकी डॉलर्स या कमाईला मागे टाकत, सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू हा मान मिळवला. गेल्या वर्षात रॉजर फेडररने दणक्यात पुनरागमन करत आपल्याला टेनिसचा अनभिषिक्त सम्राट का म्हणतात हे दाखवून दिलं. यंदा फेडररच्या खात्यात ऑस्ट्रेलिया आणि विम्बल्डन या दोन ग्रँडस्लॅम स्पर्धांची विजेतेपदं जमा आहेत. याव्यतिरिक्त अन्य स्पर्धांच्या अंतिम फेरीतही फेडररने बाजी मारली आहे. या कामगिरीमुळे रॉजर फेडरर जागतिक क्रमवारीत दुसरं स्थान मिळवलं. आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा youtube.com/LokmatNews

Комментарии

Теги:
Lokmat, Sport, Update, खेळाडूं, ठरला, सगळ्यात, श्रीमंत, व्यक्ती, News