निसर्गाचा अजब महिमा । सहारा वाळवंटात पडला बर्फ | Lokmat Latest News Update | Lokmat News

0 просмотров 13.09.2021 00:01:06

Описание

ग्लोबल वार्मिंगचे परिणाम किती वाईट आहेत हे गेल्या कित्येक दिवसांपासून आपण पाहत आहोत. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचे बदल जाणवत आहेत. बॉम्ब चक्रीवादळामुळे अमेरिकेत कडाक्याची थंडी पडून नायगरा गोठला आहे. सिडनीमध्येही तापमानानं उच्चांक गाठला असून रविवारी तिथलं तापमान ४५ अंश सेल्शियसच्या आसपास पोहोचलं होतं. पुन्हा एकदा बदललेल्या वातावरणामुळे सहारा वाळवंटात बर्फवृष्टी झाली आहे. गेल्या चाळीस वर्षांत तिसऱ्यांदा सहारामध्ये बर्फवृष्टी झाली आहे. सहारा वाळवंटामधल्या काही भागात बर्फाची चादर पसरली आहे. एरव्ही असह्य उष्णता आणि दूरदूरपर्यंत पसरलेल्या वाळूच्या डोंगराला बर्फवृष्टीमुळे एक वेगळेच रुप प्राप्त झालं आहे. अल्जेरियामधल्या एन सेफ्रा भागात ही बर्फवृष्टी झाली आहे. हा भाग सहारा वाळवंटातच येतो. एरव्ही इथलं तापमान ३५ अंश सेल्शिअस असतं, परंतु आता इथे तापमान १ अंश सेल्शिअसच्या आसपास पोहोचलं आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात इथे बर्फवृष्टी झाली होती. आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा youtube.com/LokmatNews

Комментарии

Теги:
निसर्गाचा, महिमा, सहारा, वाळवंटात, पडला, बर्फ, Lokmat, Latest, News, Update