ती ठरली त्याच्या आयुष्यातली शेवटची चोरी | Latest Lokmat Update | Lokmat Marathi News
Описание
कराडच्या चौंडेश्वरीनगर नगर येथे एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. येथील गजानन हौसिंग सोसायटी पूर्व येथील पायस एन्टरप्रायजेस बंगल्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्याचवेळी बंगल्यात चोरीचा प्रयत्न झाल्याचेही उघड झाले होते. या व्यक्तीचा मृत्यू हदयविकारच्या झटक्याने झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले होते. मात्र, ही व्यक्ती या ठिकाणी कशी आली, याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार ही व्यक्ती चोरीच्या उद्देशाने बंगल्यात शिरली असावी. यावेळी त्याच्यासोबत अन्य साथीदारही असावेत. त्यांनी बंगल्यातील कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न फसला. याचदरम्यान चोरट्यांपैकी एकाला हदयविकाराचा झटका आला असावा. मात्र, चोरट्याचे साथीदार त्याला तेथे सोडून पळून गेले असावेत. त्यामुळे उपचारांअभावी चोरट्याचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा youtube.com/LokmatNews
Комментарии