Shiv Jayanti: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर शिवजयंती उत्साहात संपन्न

4,034 просмотров 19.02.2021 00:01:02

Описание

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जन्मसोहळा साजरा होत आहे. शिवनेरीवर उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले असून मुख्यमंत्रीसुद्धा पोहोचले आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही सोबत आहेत. खासदार संभाजीराजे छत्रपती हेसुद्धा जन्मसोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं यंदा काही निर्बंध घातले आहेत. सरकारने 100 जणांनाच परवानगी दिली ही संख्या 300 ते 500 पर्यंत असती तर बंर झालं असतं अशी भावना संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्ती केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा निवडक नागरिक आणि मोजक्याच शिवभक्तांना प्रवेश दिला जात आहे. यासाठी पासेस दिलेल्यांनाच शिवनेरीवर जाता येणार आहे. दरम्यान, त्याआधी सकाळी साडेसातच्या सुमारास शासकीय पुजा शिवाई मंदिरात पार पडली. जिल्हाधिकाऱ्यांनी ही पूजा केली. त्यानंतर आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत जन्मसोहळा पार पडला.

Комментарии

Теги:
Shiv, Jayanti, मुख्यमंत्र्यांच्या, उपस्थितीत, शिवनेरीवर, शिवजयंती, उत्साहात, संपन्न