'रक्तानं रेखाटलं अजित पवारांचं चित्र'; बार्शीहून आलेल्या चित्रकारानं सांगितली दादांची आठवण смотреть онлайн
Описание видео
<p>पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिमसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांना शेवटचा निरोप देताना संपूर्ण बारामतीत शोकाकूल वातावरण दिसून आलं. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अजित पवार यांचे समर्थक बारामतीत आले. आपल्या लाडक्या 'दादा'ला शेवटचा निरोप देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर जनसागर उसळला. या जनसागरमध्ये बार्शी येथील दिव्यांग चित्रकार महेश म्हस्के यानंअजित पवार यांचं रेखाचित्र रक्तानं रेखाटल्याचा दावा केला. हा तरुण बार्शी येथून अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी बारामती येथे आला. यावेळी तो म्हणाला की, माझी दोन ते तीन वेळा अजित पवार यांच्याशी भेट झाली. त्यांनी माझ्या चित्रांच कौतुक केलं. त्यांना एक ते दोन चित्रेदेखील दिली होती. पण, आज अशा पद्धतीनं रक्ताने चित्र काढण्याची वेळ येईल, असं वाटलं नव्हतं. अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचं कळल्यावर विश्वास बसला नाही. मी तत्काळ रक्तानं अजित पवार यांचं चित्र रेखाटलं. आज अंत्यसंस्कारसाठी आलो .</p> Рекомендуем 'रक्तानं रेखाटलं अजित पवारांचं चित्र'; बार्शीहून आलेल्या चित्रकारानं सांगितली दादांची आठवण посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя