Pune Crime News : रस्त्यावर बाईकने कट मारल्याने बाचाबाची, गजा मारणे गँगची मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारहाण, तिघांना अटक, मारणेचा भाचा फरार

14 просмотров 21.02.2025 00:05:03

Описание

केंद्रीय नागरी उद्यान मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जवळच्या व्यक्तीला गुंड गजानन मारणे टोळीतील गुंडांनी मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोथरूड भागात गाडीचा धक्का लागल्याने वाद झाला आणि त्यातून आय टी इंजिनियर असलेल्या देवेंद्र जोग यांना मारहाण करण्यात आली आहे. देवेंद्र जोग शिवजयंतीच्या दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारीला बुधवारी दुपारी कोथरूड भागातील भेलके नगर परिसरातून दुचाकीवरून निघाले असता गजानन मारणे टोळीतील बाबू पवार, किरण पडवळ, ओम तीर्थराम आणि अमोल तापकीर या चौघांनी गाडीचा धक्का लागला असं म्हणून जोग यांना बेदम मारहाण केली. ज्यामध्ये जोग यांच्या नाकाला नाकाला गंभीर दुखापत झाली असून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. केंद्रीय नागरी उद्यान मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जवळच्या व्यक्तीला गुंड गजानन मारणे टोळीतील गुंडांनी मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोथरूड भागात गाडीचा धक्का लागल्याने वाद झाला आणि त्यातून आय टी इंजिनियर असलेल्या देवेंद्र जोग यांना मारहाण करण्यात आली आहे. देवेंद्र जोग शिवजयंतीच्या दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारीला बुधवारी दुपारी कोथरूड भागातील भेलके नगर परिसरातून दुचाकीवरून निघाले असता गजानन मारणे टोळीतील बाबू पवार, किरण पडवळ, ओम तीर्थराम आणि अमोल तापकीर या चौघांनी गाडीचा धक्का लागला असं म्हणून जोग यांना बेदम मारहाण केली. ज्यामध्ये जोग यांच्या नाकाला नाकाला गंभीर दुखापत झाली असून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

Комментарии

Теги:
Pune, Crime, News