Eknath Shinde Vidhan Sabha Speech Live : मी कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून केव्हाही बरा, तुम्ही तर... |
Описание
आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी कधीही गद्दारी केली नाही, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत म्हटलं. असंगांशी संग करण्यापेक्षा मी कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून कधीही बरा, तुम्ही तर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना जेवणाच्या ताटावरून उठवलं आणि त्यांना जेलमध्ये टाकलं असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि विरोधी पक्षांना लगावला. विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्र्यांचा उल्लेख आज कंत्राटी मुख्यमंत्री असा करण्यात आला, त्यावर उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं. गेल्या वर्षी 24 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्या घटनेचा आज मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला आणि उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षांवर टीका केली. #MaharashtraAssembly #EknathShinde #maharashtra #MonsoonSession #Shivsena
Комментарии