Amol Mitkari Vs Mahesh Shinde : विधान भवनाच्या पायऱ्यांवर नेमकं काय झालं? पाहा आमदारांचा राडा

1,888 просмотров 24.08.2022 00:03:07

Описание

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज अभूतपूर्व असा गोंधळ घडला. महाराष्ट्रात एकीकडे शेतकरी अडचणीत आहे. अनेक प्रश्न आ वासून राज्यासमोर उभे आहेत. असं असताना लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवलेल्या या प्रतिनिधींकडून अशी कृती निश्चितच लाजिरवाणे असल्याचं बोललं जात आहे. सकाळी कामकाज सुरु होण्याची काही वेळापूर्वी सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी हाऊस सुरु होण्याआधी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. यावेळी शिंदे गटातील महेश शिंदे (Mahesh Shinde) आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं.

Комментарии

Теги:
Amol, Mitkari, Mahesh, Shinde, विधान, भवनाच्या, पायऱ्यांवर, नेमकं, झालं, पाहा, आमदारांचा, राडा