भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी | Nashik Doctor Sanjay Shinde Killed in Accident

18,847 просмотров 13.09.2021 00:01:02

Описание

नाशिकचे डॉक्टर संजय शिंदे अपघातात ठार नाशिक : येथून मोखाडा येथे मोटारीने जात असताना त्रंबकेश्वर रस्त्यावर अंजनेरी शिवारात त्यांच्या गाडीचे टायर फुटल्याने मूळचे नाशिक येथील डॉ .संजय पोपटराव शिंदे (४५,कामटवाडा, सिडको) हे ठार झाले. या अपघातात दोन जखमी झाले आहेत. कारचे टायर फुटल्याने चालक शिंदे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहन पुलाचा कठडा तोडून नाल्यात जाऊन कोसळले. अपघातमध्ये शिंदे यांना गंभीर मार लागला. दरम्यान परिसरातील नागरिकांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेऊन शिंदे यांना मोटारीतून बाहेर काढले दरम्यान त्यांना रुग्णालयात हलविण्यात येत असताना नाशिक कडे जाणारी खाजगी वाहने थांबण्यास तयार नव्हती सुदैवाने गर्भवती स्त्रीला प्रसूतीसाठी त्र्यंबकेश्वर येथून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात घेऊन जाणारी 108 रुग्णवाहिका घटनास्थळावरून आली असता नागरिकांनी थांबून अपघाताची माहिती दिली डॉक्टर यांनी तत्काळ शिंदे यांना रुग्णवाहिकेत टाकून प्रथम उपचार सुरू केले प्राणवायू सपोर्ट देऊन रुग्णवाहिकेच्या पायलट चालकाने वाऱ्याच्या वेगाने रुग्णवाहिका नाशिकच्या दिशेने धाडली दरम्यान जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका पोहोचले असतात शिंदे यांना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले या अपघातामध्ये 2 प्रवासी अजून जखमी असल्याचे समजते त्यांच्यावर नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे मात्र जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाही. आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! #LokmatNews #nashik Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat apr-oct19

Комментарии

Теги:
भीषण, अपघात, एकाचा, मृत्यू, जखमी, Nashik, Doctor, Sanjay, Shinde, Killed, Accident