मृत्यू आ वासून उभा असताना सुद्धा केले लग्न | Lokmat Latest Update | Lokmat Marathi News
Описание
लग्नात नवरा-नवरी एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याची शपथ घेतात आणि नव्या आयुष्याची सुरुवात करतात. मात्र अमेरिकेतल्या न्यू जर्सीमध्ये अनोखं आणि दु:खद लग्न पार पडलं. लग्न दु:खद या अर्थाने होतं कारण या लग्नातील नवरी मुलगी तिच्या आयुष्याच्या अंतिम घटका मोजत होती आणि हे लग्न लागलं त्यावेळी ती ऑक्सिजन मास्कसह अंथरुणावर होती. अमेरिके तील डेविड मोशर या युवकाने हेदर लिन्डसे या तरुणीशी हास्पिटलमध्ये लग्न केलं. हेदर हिला ब्रेस्ट कॅन्सर या आजारानं ग्रासलं होतं. या आजारामुळे तिचा मृत्यू होणार आहे हे ती जाणून होती. त्यामुळे तिने मृत्यूपूर्वी लग्न करण्याच निर्णय घेतला. हेदर आणि डेविड २०१५मध्ये भेटले होते, त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. हेदरच्या मैत्रिणीने त्यांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोंमध्ये हेदर हॉस्पिटमध्ये बेडवर झोपलेली दिसत आहे. हेदरची प्रकृती अत्यंत खालावलेली असल्याने ती लग्नाची शपथ देखील बोलू शकत नव्हती. दुर्दैवाने हे लग्न फार काळ टीकू शकलं नाही आणि अवघ्या १८ तासांनंतर हेदरच्या मृत्यू झाला आणि एका प्रेम कहाणीचा अंत झाला. आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा youtube.com/LokmatNews
Комментарии