आणि Sachin Tendulkar ने आणले Vinod Kambli ला पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात | Lokmat News

1 просмотров 13.09.2021 00:01:26

Описание

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी ही जोडी शारदाश्रम शाळेपासून अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये खेळली. रमाकांत आचरेकर सरांच्या तालमीमध्ये दोघेही तयार झाले. विनोदने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कॉमेन्ट्री देण्यास सुरूवात केली. विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांच्या मैत्रीमध्ये एका रिएलिटी शोमुळे तणाव निर्माण झाल्याचे काहींचे म्हणणे होते. पण नुकत्याच एका क्रिकेटवर आधारित पुस्तकाच्या अनावरणाच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा सूर जुळले. क्रिकेट कोच म्हणून विनोद कांबळी पुन्हा क्रिकेटच्या मैदानात आला आहे. विनोदने वांद्रे परिसरात अकॅडमी सुरू केली आहे. सचिन तेंडुलकरने माझ्यातील क्रिकेट प्रेमाला आणि आचरेकर सरांनी दिलेल्या मौल्यवान ठेव्याला पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्या साठी प्रेरणा दिल्याचे विनोदने सांगितले आहे. सचिनच्या सल्ल्यानुसार मी नव्या पिढीला क्रिकेट प्रशिक्षण देण्यासाठी नवी अकॅडमी सुरू करत असल्याचे सांगितले आहे. आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा youtube.com/LokmatNews

Комментарии

Теги:
Sachin, Tendulkar, आणले, Vinod, Kambli, पुन्हा, एकदा, क्रिकेटच्या, मैदानात, Lokmat, News