तीन महिन्यानंतर kolhapur शहरातील सर्व दुकाने सुरु |Coronavirus | Lockdown | Shop | Sakal Media
Описание
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल तीन महिने कापड दुकान, शोरूमसह व जीवनावश्यक आणि अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने बंद होते. आज परवानगी मिळेल उद्या परवानगी मिळेल या आशेवर व्यापाऱ्यांनी अखेर आम्ही दुकाने उघडणार असा पवित्रा घेतला. त्यामुळे आज शहरातील सर्व दुकाने पुढील पाच दिवसांसाठी उघडण्यास परवानगी दिल्याची माहिती रात्री उशिरा पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. त्यानुसार आज कोल्हापुरातील महाद्वार लक्ष्मी रोड, राजारामपुरीतील सर्व दुकानांचे शटर उघडले आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करत सॅनिटायझर आणि टेंपरेचर तपासूनच दुकानात ग्राहकांना प्रवेश दिला जात आहे. एकमेकांना शुभेच्छा देत आज शहरातील सर्व बाजार खुला झाला. याबाबत व्यापाऱ्यांनीही कोरोनाचे निर्बंध पाळून व्यापार करण्याचे आवाहन केले आहे. (बातमीदार - लुमाकांत नलवडे ) (व्हिडिओ - बी.डी.चेचर)
Комментарии