पुरंदरमधील कुंभारवळणच्या शिक्षिकेसह मुलांनी साधला थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद | Pune | Sakal Media | смотреть онлайн
Описание видео
खळद ता.१८: महाराष्ट्र शासनाच्या महानेट फेज २ या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका शीतल खैरे-जाधव व त्यांचे विद्यार्थी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमाला संपूर्ण पुणे जिल्ह्यातून कुंभारवळण या एकमेव गावाची निवड करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी गटविकासाधिकारी अमर माने,गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड ,केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप,मंडल अधिकारी प्रभावती कोरे,आरोग्य विभाग प्रमुख बेलसर, जि.प.प्राथ.शाळा कुंभारवळण चे सर्व शिक्षक,पालक उपस्थित होते. यावेळी आढावा अहवालाच्या निमित्ताने गावाला मिळालेल्या मोफत इंटरनेट सुविधेच्या माध्यमातून शितल खैरे-जाधव यांनी मुख्यमंत्री साहेबांसमोर ऑनलाईन पाठाचे उत्कृष्ट सादरीकरण केले तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. व महानेटच्या माध्यमाने कोरोना संकटात ऑनलाईन शिक्षणामध्ये मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणातील अडसर दूर होऊन विद्यार्थ्यांचा दर्जा नक्कीच उंचावणार असल्याचा विश्वास त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आणि महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान विभागाचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री साहेबांनी ऑनलाईन शिक्षणाबाबत काही सूचना असतील तर त्या आम्हाला शिक्षकांनी नक्की कळवा असे आवाहन केले. मुख्यमंत्री साहेबांशी सुसंवाद साधण्यासाठी खैरे यांना शिक्षण विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले. Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV. Рекомендуем पुरंदरमधील कुंभारवळणच्या शिक्षिकेसह मुलांनी साधला थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद | Pune | Sakal Media | посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя