Latest Marathi News I Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
Описание
- सकल मराठा समाजाचे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यव्यापी गोलमेज परिषद बुधवारी कोल्हापुरात. परिषदेसाठी मराठा समाजाच्या 50 संघटनांचे पदाधिकारी तसेच समाजातील प्रतिष्ठीत विचारवंत उपस्थित राहणार. - राज्यातील धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीतील आरक्षणासाठी यशवंत ब्रिगेडचा तीव्र आंदोलनाचा इशारा. - इचलकरंजी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना नगरपालिका प्रशासनाने दंड भरण्याची बजावली नोटीस. - साठ हजार रुपयांच्या लाच प्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक आणि डी.बी शाखेचा प्रमुख अभिजित गुरव आणि कॉन्स्टेबल रोहित पोवार याच्यासह पंटरवर कारवाई. - जे ओबीसीला देता ते मराठा समाजाला द्या, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. बातमीदार - लुमाकांत नलवडे व्हिडीओ - बी.डी. चेचर
Комментарии